माझ्यासारख्या अनेक दैवतवादी हिंदू संस्कृतीत रुजलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का? सगळेच राहीनात! कोणी कोणावर जुलूम नाही केला, म्हणजे झाले!
‘सरकारचे पित्त्ये’, ‘देशद्रोही’ अशा सर्व तऱ्हेच्या शिव्या खाऊनही त्यांनी रागाच्या भरात किंवा सत्तेच्या लालसेने स्वजनद्रोह व लोकशाही तत्त्वांशी द्रोह केला नाही. त्यांचे राजकारण अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांचे लिखाण बहुजन समाजाच्या वृत्ती थरारून सोडण्यासाठी नसून, बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी होते. त्यांनी आपल्या शहाणपणाची प्रौढी मारली नाही, देशभक्तीचे प्रदर्शन केले नाही; उद्दाम तर ते कधीच नव्हते.......